नगर जिल्ह्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून सोनईतील यशवंतनगर येथून घरातून दोन दिवसांपूर्वी निघून गेलेल्या एका व्यक्तीचा कायगाव टोका येथील गोदावरी नदीच्या गंगापूर हद्दीत मृतदेह आढळून आला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , राजू जान मोहम्मद शेख ( वय 50 वर्ष ) असे मयत व्यक्ती यांचे नाव असून दोन दिवसांपूर्वी ते दुकानात जातो म्हणून घरातून निघून गेलेले होते मात्र उशिरापर्यंत ते आले नाहीत म्हणून नातेवाईकांनी अखेर सोनई पोलिसात फिर्याद दिली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असतानाच त्यांचा मृतदेह छत्रपती संभाजीनगर रोडवरील कायगाव टोका येथे आढळून आलेला आहे. गेल्या काही महिन्यांपासून कायगाव टोका परिसरात आत्महत्येचे प्रमाण वाढलेले पाहायला मिळत असून या ठिकाणी सक्षम पोलीस बंदोबस्त आता गरजेचा झालेला आहे.