नेवासा फाट्यावर एका लॉजवर छापा , पोलीस पोहोचले तेव्हा.. 

शेअर करा

नगर जिल्ह्यात नेवासा फाट्यावर एका लॉजवर छापा टाकून तीन महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या इसमांच्या विरोधात नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. 

वरिष्ठ पोलीस अधिकारी संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आलेली असून अजय अशोक कोळेकर ( राहणार मक्तापूर तालुका नेवासे ), निलेश एकनाथ शेंडगे ( राहणार नेवासे ) हनुमान पांढरे व रवींद्र बाळासाहेब मोकाटे ( राहणार मोकाटे मळा बुरडगाव रोड अहिल्यानगर ) अशी गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. 

पोलिसांनी कारवाई करून तीन महिलांची या ठिकाणावरून सुटका केलेली असून सर्व आरोपींच्या विरोधात नेवासा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 143 याच्यासोबत महिला आणि मुली यांचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा 1956 चे कलम तीन चार पाच सहा सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


शेअर करा