अमित शहा यांना खाऊ घालण्यासाठी सरकारी खर्चातून दीड कोटी रुपये तर दीड लाखांसाठी शेतकऱ्याची आत्महत्या

शेअर करा

नापिकी आणि बँकेचे कर्ज या विवंचनेतून परभणीच्या सचिन बालाजी जाधव या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. तर पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या गर्भवती पत्नीनेही विष घेत आत्महत्या केली. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला जोरदार लक्ष्य केले आहे.

काय म्हणाले राजू शेट्टी ? 

परभणी जिल्ह्यातील सचिन जाधव हा शेतकरी दीड लाख रुपये कर्ज झाले म्हणून स्वतः आत्महत्या केली. ते पाहून त्याच्या पत्नीनेही सांगकळी आत्महत्या केली. त्याची पत्नी सात महिन्याची गर्भवती होती म्हणूनच सरकारने दीड लाखाच्या कर्जासाठी तीन निष्पाप जीवांचा बळी घेतला.

दुसरीकडे देशाचे गृहमंत्री अमित शहा रायगडच्या दौऱ्यावर आल्यानंतर सुनिल तटकरे यांच्या घरी १ वाटी आमरस आणि १ मोदक खाण्यासाठी सरकारी खर्चातून दीड कोटी रुपयाचे हेलिपॅड बांधले. देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीमध्ये कर्जमुक्तीचा दिलेला शब्द पाळला असता तर परभणी येथील शेतकरी व ७ महिन्याच्या गरोदर पत्‍नीचा जीव वाचला असता . राज्य शासनाने कर्जमाफीचा दिलेला शब्द पाळावा

सचिन जाधव यांनी माळसोन्ना शिवारातील शेतीवर स्टेट बँक ऑफ इंडियाकडून कर्ज काढले होते. बँकेचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून तणावाखाली येऊन त्यांनी फवारणीचे विषारी औषध प्राशन केले. पतीचा मृत्यू झाल्याचे समजताच त्याची पत्नी ज्योती यांनी देखील विष घेतले त्यात त्यांचाही मृत्यू झाला. सुनील तटकरेंच्या आग्रहाखातर आणि शहांच्या जेवणासाठी सरकारी तिजोरीवर भार कशासाठी? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित करून संताप व्यक्त केला आहे.


शेअर करा