नगरमध्ये एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या एका व्यक्तीने रात्रीच्या वेळी रुग्णालयातून पलायन केले मात्र पळून जाताना अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली त्यानंतर उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झालेला आहे. 21 तारखेला हा प्रकार पहाटेच्या सुमारास घडला.
उपलब्ध माहितीनुसार , बाबासाहेब मोहन बर्डे ( वय 43 वर्ष राहणार आडगाव तालुका पाथर्डी ) असे मयत व्यक्तीचे नाव असून तोफखाना पोलिसात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.
17 एप्रिल रोजी बाबासाहेब बर्डे यांनी विषारी औषध प्राशन केलेले होते त्यानंतर त्यांच्या पत्नीने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर औषध उपचार सुरू असताना पहाटेच्या सुमारास ते रुग्णालयातून पळून गेले मात्र पत्रकार चौकात त्यांचा अपघात झाला त्यांना पुन्हा तात्काळ जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले मात्र त्यांचा मृत्यू झालेला होता.