पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात पाकिस्तानच्या विरोधात संतापाची लाट असून आत्तापर्यंत 26 निष्पाप लोकांचे यामध्ये प्राण गेलेले आहेत. एकीकडे धार्मिक द्वेष पसरवावा म्हणून काही समाजविघातक प्रवृत्ती कार्यरत असतानाच दुसरीकडे एका स्थानिक काश्मिरी घोडेवाल्याची सोशल मीडियात चर्चा आहे.
उपलब्ध माहितीनुसार , सय्यद आदिल हुसेन शाह असे या घोडेवाल्याचे नाव असून त्याने देखील या हल्ल्यात प्राण गमावलेले आहेत. पर्यटकांवर अतिरेकी गोळीबार करत होते त्यावेळी त्याने हे काश्मीरचे पाहुणे आहेत त्यांना मारू नका अशी तो विनंती करत होता मात्र नराधम दहशतवाद्यांनी त्याचे बोलणे ऐकले नाही उलट त्याच्यावरच बेछूट गोळीबार केला त्यात तो मृत्युमुखी पडला.
सय्यद आदिल हुसेन शाह हा घोडेवाला होता. मंगळवारी दुपारी दहशतवाद्यांनी इथे हल्ला केला त्यावेळी तो न घाबरता अतिरेक्यांना भिडला आणि हे काश्मीरचे पाहुणे आहेत त्यांना मारू नका असे सांगत होता मात्र दहशतवाद्यांनी ऐकले नाही म्हणून त्याने त्यांची रायफल हिसकावण्याचा प्रयत्न केला मात्र दहशतवाद्यांनी त्याच्यावरच गोळीबार केला त्यात तो मृत्युमुखी पडला.
सय्यद याच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना ,’ तो घोडा घेऊन गेलेला होता. आम्हाला दुपारी हल्ल्याची माहिती मिळाली आम्ही त्याला फोन केला पण त्याचा फोन बंद होता. काही वेळाने फोन वाजला मात्र कोणी उचलला नाही त्यानंतर रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. सय्यद हा कुटुंबाचा सगळ्यात मोठा आणि एकटाच कमावणारा मुलगा होता . काश्मीरच्या सुपुत्राने जे केलं ते संपूर्ण देश कधी विसरणार नाही ,’ असे म्हटलेले आहे दुसरीकडे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सय्यद आदिल हुसेन शाह याच्या वडिलांची भेट घेतलेली असून त्यांचे सांत्वनही केले आहे.