जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात राज्यभर आंदोलन , काय आहे नेमकं विधेयकात ? 

शेअर करा

व्यक्ती आणि संघटना यांना बेकायदेशीर ठरवत अमर्याद अधिकार राज्य सरकारच्या हातात देणाऱ्या जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात 22 तारखेला डावे पक्ष आणि समविचारी संघटनांनी राज्यभर तीव्र आंदोलन केलेले आहे. संगमनेर प्रांत कार्यालयावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली जोरदार शक्ती प्रदर्शन करत राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला आहे. 

जन सुरक्षा विधेयका विरोधात बोलताना आंदोलकांनी ,’ राज्य सरकार शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी हा कायदा आणत असल्याचे सांगत असले तरी प्रत्यक्षात सरकारच्या धोरणाविरुद्ध संघर्ष करणाऱ्या आणि आवाज उठवणाऱ्या कोणत्याही व्यक्ती आणि संघटनेच्या विरोधात या विधेयकामुळे सरकारच्या हातात बेसुमार कारवाईचे अधिकार येणार आहेत , ‘ असे म्हटले आहे. 

आंदोलकांनी पुढे म्हटले की ,’ अशा पद्धतीने सरकार व्यक्ती आणि संघटनांना बेकायदेशीर ठरवून त्यांच्यावर कारवाई करू शकणार असून दोन ते सात वर्षांपर्यंत शिक्षा सोबतच व्यक्तींचे नातेवाईक आणि संघटना यांच्या मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार देखील विधेयकाच्या माध्यमातून राज्य सरकारला प्राप्त होणार आहेत.’. 

संगमनेर शहरातील स्वातंत्र्य चौकात चौकातील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयाजवळ हजारो श्रमिक एकत्र आले आणि त्यानंतर मोर्चाची सुरुवात करण्यात आली होती. डॉक्टर अजित नवले यांनी महाराष्ट्राची जनता अशी दादागिरी बिलकुल खपवून घेणार नाही असा इशारा दिलेला आहे


शेअर करा