नगर शहरात एक धक्कादायक अशी घटना केडगाव परिसरात घडलेली असून एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आलेले आहेत. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सहा जणांना अटक केलेली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
14 एप्रिल रोजी हा प्रकार केडगाव परिसरात घडलेला होता. एका अल्पवयीन मुलाचे आरोपींनी अपहरण केले आणि त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. मुलाने हा प्रकार घरी सांगितल्यानंतर या प्रकाराला वाचा फुटली आणि कोतवाली पोलिसात 12 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे यांनी तपासाची सूत्रे हलवली आणि आरोपी आदित्य प्रशांत सोनुने ( वय 21 वर्ष राहणार शिवाजीनगर केडगाव ), ऋषिकेश सतीश सातपुते ( वय 25 वर्ष ) , शाहरुख अन्सार पठाण ( वय 24 वर्ष ), ओंकार दत्तात्रय राहील ( वय 22 वर्ष ), रोहित गणेश पंडागळे ( वय 24 वर्ष ) आणि मयूर अनिल आगे ( वय 27 वर्ष ) या सर्वांना अटक केली. न्यायालयासमोर त्यांना हजर करण्यात आले त्यावेळी दोन दिवसांची पोलीस कोठडी त्यांना सुनावण्यात आलेली आहे.