दिव्यांग तरुणीवर अत्याचार प्रकरणात आरोपीला इतक्या दिवसांची पोलीस कोठडी

शेअर करा

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आलेली असून एका दिव्यांग तरुणीवर एका खोलीत डांबून तिच्यावर अत्याचार करण्यात आलेला आहे. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घटलेले असून राहुरी न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , अजय संजय दिवे ( वय 23 वर्ष ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून १५ तारखेला दुपारी दीड वाजता त्याने एका बावीस वर्षीय दिव्यांग तरुणीच्या घरात घुसून तिला घरात डांबले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. 

आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो फरार झालेला होता. राहुरी पोलीस ठाण्यात 16 तारखेला त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तात्काळ तपासाची सूत्रे हलवली आणि आरोपीस जेरबंद केले. चार दिवसांसाठी त्याची रवानगी पोलीस कोठडी करण्यात आलेली आहे. 


शेअर करा