संशयानं उध्वस्त केलं कुटुंब , पाथर्डी तालुक्यातील त्या पतीचंही टोकाचे पाऊल  

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून तिचा खून केल्यानंतर आरोपी पतीला चिखली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणण्यात आलेले होते त्यावेळी त्याने स्वच्छतागृहात फरशी पुसण्याचे लिक्विड प्राशन केले आणि 19 तारखेला पहाटे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील हे दाम्पत्य होते. 

उपलब्ध माहितीनुसार , शरद रूपचंद चितळे ( वय 33 वर्ष राहणार माऊली हाऊसिंग सोसायटी रुपीनगर तळवडे मूळ राहणार पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर ) असे मयत पतीचे नाव असून कांचन शरद चितळे ( वय 26 वर्ष ) असे खून झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. 

शरद चितळे एका खाजगी कंपनीत वेल्डर म्हणून काम करायचा तर त्याची पत्नी कांचन ही आशा सेविका होती. चारित्र्याच्या संशयावरून त्यांच्यात सातत्याने वाद व्हायचे त्यातूनच रविवारी 13 तारखेला शरद याने मुलीसमोर पत्नीचा गळा आवळून खून केला आणि त्यानंतर स्वतः नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर प्रकृतीत सुधारणा होऊन त्याला डिस्चार्ज देण्यात आलेला होता. 

दरम्यानच्या काळात कांचन हिचा शवविच्छेदन अहवाल देखील प्राप्त झाला त्यामध्ये तिचा गळा दाबून खून झाल्याचे समोर आले. पोलिसांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच  शरद याला अटक केली आणि चौकशीसाठी चिखली पोलीस ठाण्यात आणलेले होते त्यावेळी हा प्रकार घडला. 19 तारखेला पहाटे पावणेतीनच्या सुमारास त्याचा मृत्यू झालेला आहे. 


शेअर करा