स्कूल बसचालकाने केली अल्पवयीन मुलीसोबत मैत्री आणि ,  श्रीगोंदा तालुक्यातील प्रकार

शेअर करा

श्रीगोंदा तालुक्यात एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार करून तिचे नको त्या अवस्थेतील फोटो आरोपींनी काढले. पीडित मुलीच्या आईच्या हि बाब लक्षात आल्यानंतर एका स्कूल बसचालकासह त्याच्या साथीदारांवर श्रीगोंदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , विकी उर्फ चंद्रकांत भोसले आणि योगेश माळी अशी आरोपींची नावे असून मुख्य आरोपी हा स्कूल बस चालक आहे. त्याने पीडित मुली सोबत ओळख झाल्यानंतर वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर या प्रकाराचे व्हिडिओ बनवत मुलीला हे व्हिडिओ तिच्या आई-वडिलांना दाखवण्याची धमकी देऊ लागला. 

दुसऱ्या आरोपीने देखील त्याला हा प्रकार करण्यात मदत केली आणि अल्पवयीन मुली सोबत आक्षेपार्ह फोटो काढले. श्रीगोंदे पोलीस ठाण्यात अत्याचारासोबत ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे पुढील तपास करत आहेत. 


शेअर करा