नगरमध्ये एक खळबळजनक अशी घटना समोर आलेली असून सब्जेल चौक परिसरात राहणाऱ्या एका महिलेने झोपेच्या गोळ्या जास्त प्रमाणात घेतल्याने त्यांचा अखेर मृत्यू झालेला आहे.
उपलब्ध माहितीनुसार , भावना सतीश उपलांची ( वय 38 वर्ष ) असे मयत महिलेचे नाव असून कोतवाली पोलिसात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.
भावना उपलांची यांनी 16 तारखेला अतिरिक्त प्रमाणात झोपेच्या गोळ्या घेतल्या त्यानंतर त्या बेशुद्ध झाल्या. शुद्धीत नव्हत्या म्हणून नातेवाईकांनी जवळच्या खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच अखेर त्यांचा मृत्यू झाला असून कोतवाली पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.