‘ सिग्नल तोडणाऱ्यांचे काय घेता इथं बलात्कारी सोडलेत ‘ , गुजरात सरकारचा ‘ तो ‘ निर्णय

शेअर करा

गुजरातमध्ये सध्या निवडणुकीचे वातावरण असून सरकारकडून नागरिकांना वेगवेगळ्या पद्धतीने ‘ रेवडी कल्चर ‘ देण्यात अथवा दाखवण्यात येत आहे असाच एक प्रकार सध्या चर्चेत आलेला असून ट्राफिक नियमांची भीती नागरिकांच्या मनातून जावी म्हणून दंड न आकारण्याचे फर्मान काढण्यात आलेले आहे. अपघाताचे प्रमाण कमी व्हावे आणि नागरिकांना सुरक्षितता मिळावी यासाठी दंडात्मक तरतूद केलेली आहे मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मानसिक त्रास होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यमंत्री हर्ष सिंघवी यांनी शुक्रवारी ही घोषणा केलेली आहे.

हर्ष सिंघवी म्हणाले की, ‘ दिवाळीच्या दिवसात नागरिकांना दंडाच्या मनस्तापातून सुटका मिळावी म्हणून हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. 21 ऑक्टोबरपासून 27 ऑक्टोबरपर्यंत ट्राफिक नियम तोडले तर तुमच्याकडून कुठलाही दंड आकारला जाणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या संमतीने आपण हा निर्णय घेतलेला आहे मात्र याचा अर्थ असा नाही की तुम्ही ट्राफिक नियम पाळायचे नाहीत फक्त जर काही चूक केली तर तुम्हाला दंड भरावा लागणार नाही .’

गुजरातमध्ये सध्या दारूबंदी असून काळ्याबाजारात दारू सहज उपलब्ध होते. काळ्या बाजारात विकल्या जाणाऱ्या दारूचे गुजरातमध्ये समांतर मार्केट बनलेले असून राजकीय पक्षांशी संबंधित लोक याच्याशी जोडले गेलेले आहेत त्यामुळे ही दारूबंदी निव्वळ कागदावरच राहिलेली आहे. गुजरातमध्ये दारू पिऊन गाडी चालवली तर दहा हजार रुपयांचा दंड किंवा सहा महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे तर ट्राफिक सिग्नल तोडला तर 1000 ते 5000 रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे मात्र दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा दंड आकारण्यात येणार नाही. सोशल मीडियावर मात्र सरकारच्या या निर्णयावर टीका केली जात असून भाजप सरकारने बलात्काऱ्यांना तुरुंगातून सोडले तर सिग्नल तोडणाऱ्यांना सोडले त्यात नवीन काय ? अशीही टीका केली जात आहे.


शेअर करा