गेले ते दिवस जेव्हा बुलेट फक्त ‘ इतक्याला ‘ यायची , जुने बिल व्हायरल

शेअर करा

बुलेटची जुनी किंमत

सोशल मीडियावर कधी कुठल्या गोष्टीची चर्चा सुरू होईल याचा काही नेम नाही.भारतात अनेक ठिकाणी अद्यापही एकेकाळी लोकप्रिय असलेल्या बुलेटची जोरदार क्रेझ आहे. तरुण आणि आणि ग्रामीण पातळीवरील आर्थिक सुबत्ता असणारे व्यक्ती यांच्यात अजूनही बुलेटची क्रेझ असून आता नवीन आलेली बुलेट हिच्या तुलनेत अद्यापही जुन्या बुलेटला हे ग्राहक पसंती देत आहेत. सोशल मीडियावर असेच एक बुलेट प्रेमी बिल व्हायरल होत असून विशेष म्हणजे त्याकाळी असलेली बुलेटची किंमत ही चर्चेचा विषय ठरलेली आहे.

जोरदार व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये जुन्या बुलेट बाईकचे एक बिल असून त्या बिलातील बुलेटची रक्कम ही खूपच कमी असल्याने या बिलाची जोरदार चर्चा सुरू झाली. आत्ताच्या परिस्थितीत चांगली बुलेट घ्यायची झाली तर सुमारे दीड ते दोन लाखांपर्यंत पैसे मोजावे लागतात मात्र एक काळ असा होता की ज्यावेळी बुलेटची किंमत ही फक्त वीस हजारांच्या आत होती. आज वीस हजार रुपयांमध्ये केवळ एखादा स्मार्टफोन येऊ शकतो त्याकाळी मात्र बुलेट येऊ शकत होती.

सध्याच्या परिस्थितीत बुलेट अनेकजण स्टेटस सिम्बॉल म्हणून वापरतात. ज्या व्यक्तीकडे बुलेट आहे तो आर्थिकदृष्ट्या सधन आहे तसेच तो डॅशिंग आहे अशी देखील इमेज बुलेटमुळे काही प्रमाणात निर्माण झालेली आहे. आपली इमेज बनवण्यासाठी म्हणून देखील अनेक व्यक्ती बुलेटचा वापर करतात मात्र एक काळ असा होता की फक्त वीस हजार रुपयांच्या आत बुलेट येऊ शकत होती अर्थातच त्या वेळी वीस हजार रुपयांना देखील तेवढी किंमत होती हे देखील सत्य आहे कारण त्या काळातील वस्तूंच्या किमती त्या त्या प्रमाणातच असायच्या मात्र काही का असेना या बिलाच्या निमित्ताने काही जुन्या आठवणी जाग्या झालेल्या आहेत.


शेअर करा