बर्फाच्या लादीत आढळला मेलेला उंदीर , अन्न औषध प्रशासन करतय काय ?

शेअर करा

पुण्यात एक धक्कादायक असा प्रकार समोर आलेला असून चार दिवसांपूर्वीच एका प्रतिष्ठित ऑटोमोबाईल कंपनीच्या समोश्यामध्ये कंडोमसोबत गुटखा आणि खडे आढळून आले होते त्याहीपेक्षा भीषण प्रकार बर्फाच्या लादीत आढळून आलेला असून बर्फाच्या लादीत चक्क मेलेला उंदीर सापडलेला आहे. अन्न औषध प्रशासन विभाग नक्की कारवाई तरी कुणावर करतो असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. 

महाराष्ट्रात सध्या ठिकठिकाणी उन्हाचा पारा जोरदार वाढलेला असून तापमान 42 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत पोहोचलेले आहे. अनेकजण उन्हाळ्यात थंडावा मिळावा म्हणून सरबत लस्सी तसेच इतर शीतपेय पसंत करतात आणि काही जण उसाचा ज्यूस तर बर्फाचा गोळा देखील खातात मात्र बर्फाच्या लादीमध्येच मृत झालेला उंदीर सापडल्यानंतर त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया जोरदार व्हायरल झालेला आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील हा प्रकार आहे. 

बर्फात उंदीर सापडल्याने जर नागरिकांच्या जीविताला काही धोका झाला तर त्यासाठी जबाबदार कोण ? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत . खाण्याचा बर्फ यासाठी पांढरा रंग आणि औद्योगिक वापरासाठीचा निळा रंग या निकषाचे देखील बहुतांश ठिकाणी पालन केले जात नाही. खाण्याच्या बर्फात उंदीर सापडल्यानंतर संबंधित खात्याने या प्रकाराची कठोर चौकशी करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 


शेअर करा