मतदान करण्यासाठी ‘ ही ‘ कागदपत्रे राहणार वैध , निवडणूक आयोगाने केले स्पष्ट

शेअर करा

लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असून मतदारांना मतदान केंद्रावर ओळख पटवून देण्यासाठी मतदार ओळखपत्र सोडून इतर बारा प्रकारचे विविध पुरावे ग्राह्य धरले जाणार असल्याची असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेले आहे. 

मतदानावेळी मतदारांना दिलेले निवडणूक ओळखपत्र त्यासोबत पासपोर्ट , ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड , नॅशनल पोपुलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले स्मार्ट कार्ड , मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले जॉब कार्ड , भारत सरकारच्या सर्व मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत निर्गमित हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेली निवृत्त वेतनाची कागदपत्रे , खासदार आमदार यांना देण्यात आलेली अधिकृत ओळखपत्रे , आधार कार्ड, भारत सरकारच्या सामाजिक न्याय सशक्तीकरण मंत्रालयाने दिलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र हे देखील मतदानासाठी वैध मानले जाईल.


शेअर करा