नगर शहरात लंकेच्या कार्यकर्त्यांनी भेटीगाठी केल्या सुरु , एमआयएमची माघार तर .. 

शेअर करा

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघ एमआयएम पक्षाच्या वतीने वतीने डॉ. परवेज अशरफी यांनी अर्ज भरलेला होता मात्र 29 तारखेला त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे. एमआयएमने निवडणुकीत एन्ट्री केल्यानंतर महाविकास आघाडीला फटका  बसण्याची शक्यता व्यक्त केली जात होती मात्र त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे अहमदनगर दक्षिण मध्ये सुजय विखे विरुद्ध निलेश लंके यांच्यातच लढत कडवी लढत होणार आहे.

नगर शहरात सध्या डॉक्टर सुजय विखे आणि निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराला सुरुवात केलेली असून काल सुजय विखे यांचे कार्यकर्ते नगर शहरातील सावेडी उपनगरात घरोघरी जाऊन प्रचार करत होते त्यानंतर आज निलेश लंके यांचे कार्यकर्ते देखील नगर शहरात सावेडी भागात घरोघरी जाऊन लंके यांना विजयी करण्याचे आवाहन करत होते. 

डॉक्टर सुजय विखे यांच्या इतकी निलेश लंके यांच्याकडे सध्या यंत्रणा नाही मात्र लंके यांच्याकडे जिद्दीचे कार्यकर्ते जास्त आहेत. सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर झाली तेव्हाच पक्षाच्या अंतर्गत विरोधाचा सामना त्यांना करावा लागलेला होता. पक्षाचा आदेश पाळून सध्या भाजपचे कार्यकर्ते कार्यरत असले तरी सुजय विखे यांच्याविषयी भाजपचेच कार्यकर्ते सकारात्मक बोलताना दिसून येत नाहीत उलट निलेश लंके यांच्यासाठी पदरमोड करून कार्यकर्ते सध्या प्रचार करत आहेत.


शेअर करा