दिव्यांग मुलाच्या गळ्यातील लॉकेटने पोलिसांना सिग्नल, मुलाला घरी पोहचवलं 

शेअर करा

तंत्रज्ञानाचा वापर किती चांगला वापर केला जाऊ शकतो याचा याची प्रचिती देणारा एक प्रकार मुंबईत समोर आलेला असून दक्षिण मुंबई परिसरातील कुलाबा भागात एक बारा वर्षाचा दिव्यांग मुलगा फिरत होता. बराच वेळ त्याच्याकडे कुणाचे लक्ष नव्हते मात्र हा प्रकार लक्षात आल्यावर दिव्यांग मुलासोबत बोलण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला मात्र त्याला बोलता येत नसल्याने त्याच्या गळ्यातील लॉकेटवर पोलिसाची नजर गेली आणि अखेर तो त्याच्या कुटुंबापर्यंत पोहोचला. 

दिव्यांग असल्याकारणाने तर त्याला बोलता येत नव्हते मात्र नागरिक त्याला पोलिसांकडे घेऊन गेले त्यावेळी पोलिसांनी इतर पोलीस ठाण्यांना देखील अलर्ट पाठवला मात्र व्यवस्थित विश्वासार्ह अशी माहिती हाती आली नाही त्याचवेळी एका पोलीस कर्मचाऱ्यांचे लक्ष त्याच्या गळ्यातील लॉकेटकडे गेले त्यावेळी लॉकेटवर एक क्यूआर कोड होता. 

सदर क्यूआर कोड मोबाईलवर स्कॅन केल्यानंतर एक फोन नंबर मिळाला आणि त्यानंतर दिव्यांग मुलांसाठी काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेसोबत संपर्क झाला आणि अखेर या मुलाला संस्थेच्या माध्यमातून त्याच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवण्यात पोलिसांना यश आले. 


शेअर करा