नगर स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई ,  शेतात पुरलेले सोने काढून केले जप्त

शेअर करा

नगर शहराजवळील वाळुंज येथील दरोड्याच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या एका व्यक्तीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केलेले असून त्याच्याकडून सुमारे एक लाख 40 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहेत. 

उपलब्ध माहितीनुसार , जनार्दन संभाजी हिंगे ( वय 37 वर्ष राहणार वाळुंज तालुका नगर ) असे  फिर्यादी व्यक्ती यांचे नाव असून आरोपींनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडला आणि त्यानंतर घरात प्रवेश करून घरातील सात लाख पाच हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रक्कम चोरून नेली. 11 नोव्हेंबर रोजी हा प्रकार घडलेला होता आणि नगर तालुका पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. 

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर या घटनेचा समांतर तपास करत होते त्यावेळी गुप्त सूत्रांच्या माध्यमातून त्यांना सदर घटनेतील मुख्य आरोपी असलेला प्रशांत चव्हाण हा चिचोंडी पाटील परिसरात आलेला असल्याची माहिती समजताच आरोपीला ताब्यात घेण्यात आले. आरोपी प्रशांत चव्हाण याचे इतर साथीदार असलेले निमलेश देशपांड्या चव्हाण, ऋषिकेश दिगू भोसले , अहिल्याशा जंगला भोसले , गणेश दिवाणजी काळे हे सर्वजण फरार झालेले असून त्यांच्यासोबत आपण हा गुन्हा केल्याची कबुली प्रशांत चव्हाण याने दिलेली आहे. आरोपीच्या वाट्याला आलेले सोन्याचे दागिने त्याने एका शेतात पुरून ठेवलेले होते ते जप्त करण्यात आलेले आहेत. 


शेअर करा