फेक मेसेज समजून दुर्लक्ष केले पण खरोखर खात्यात दीड कोटी आले , त्यानंतर मात्र..

शेअर करा

सोशल मीडियावर एका व्यक्तीच्या प्रामाणिकपणाची सध्या जोरदार चर्चा सुरू महाराष्ट्रातील नांदेड येथील हे प्रकरण आहे. सदर व्यक्तीच्या खात्यात चुकून चक्क दीड कोटी रुपये जमा झालेले होते मात्र तरीदेखील त्यांच्या मनात कुठलीही लालसा नसल्याने त्यांनी हे पैसे त्यांनी संबंधित व्यक्ती यांना प्रामाणिकपणे परत केलेले आहेत. नरसी येथील पेट्रोलपंप चालक चंद्रकांत पाटील असे या व्यक्तीचे नाव असून त्यांच्या प्रामाणिकपणाचे परिसरात जोरदार कौतुक केले जात आहे .

उपलब्ध माहितीनुसार, चंद्रकांत पाटील यांचा पेट्रोलपंप असून 31 मार्च रोजी सकाळी संध्याकाळी त्यांच्या खात्यावर अचानकपणे दीड कोटी रुपये जमा झाल्याचा त्यांना मेसेज आलेला होता. सदर आलेला मेसेज हा फेक मेसेज असेल असे समजून त्यांनी दुर्लक्ष केले मात्र रात्री एका कंपनीच्या अधिकाऱ्याचा फोन आला त्यामध्ये त्याने तुमच्या खात्यावर चुकून आमच्याकडून दीड कोटी रुपये ट्रान्सफर झालेले आहेत असे त्यांनी सांगितले त्यावेळी हा मेसेज खरा असल्याची त्यांना लक्षात आले आणि त्यांनी समोरील व्यक्तीला काहीही काळजी करू नका तुमचे सर्व तुमच्या खात्यावर ट्रान्सफर करतो असे त्यांना सांगितले.

चंद्रकांत पाटील यांनी त्यानंतर अवघ्या काही मिनिटाच्या आत सर्व दीड कोटी रुपयांची रक्कम पुन्हा ज्या खात्यावर वरून आलेली होती तिकडे ट्रान्सफर केली . पैसे खात्यावर जमा झाल्यापेक्षा ते परत केल्यानंतर मला जो काही आनंद झाला तो पैसे जमा झालेल्या मेसेजपेक्षाही जास्त होता अशी देखील प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिलेली आहे.


शेअर करा