‘ विनयभंग ‘ लावत नाही , नगरमध्ये हवालदार एसीबीच्या जाळ्यात

शेअर करा

नगर शहरात लाचखोरीचा एक अद्भुत प्रकार सध्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात समोर आलेला असून कचरा टाकल्यावरून दोन शेजाऱ्यात वाद झाल्याने विनयभंगाचा गुन्हा नोंद न करण्याच्या बदल्यात किरकोळ कलमे लावू यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या एका पोलीस हवालदाराला बुधवारी अटक करण्यात आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , नंदलाल मुरलीधर खैरे ( एमआयडीसी पोलीस ठाणे नागापूर ) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव असून तक्रारदार व्यक्ती आणि शेजारी यांच्यात कचरा टाकण्यावरून वाद झालेला होता. तक्रारदार व्यक्ती यांची भावजयी किरकोळ हाणामारीमध्ये जखमी देखील झाली म्हणून त्यांनी अखेर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल केला.

घटनेचा पंचनामा करण्यासाठी म्हणून खैरे हे तक्रारदार व्यक्ती यांच्या घरी गेले त्यावेळी त्यांनी तुमचे शेजारी देखील तुमच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करणार आहेत असे अशी सांगितलेले आहे मात्र विनयभंगाचा गुन्हा दाखल न करण्यासाठी म्हणून तीस हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली .किरकोळ कलम लावून आपण प्रकरण मिटवून टाकू असे देखील तो म्हणाला मात्र तक्रारदार व्यक्ती यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ नंबर वर फोन करून या प्रकाराची कल्पना दिली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार आल्यानंतर याची शहानिशा करत आरोपी हवालदार असलेला खैरे याने तीस हजार रुपयांची मागणी करून दहा हजार रुपये घेण्याची देखील तयारी दाखवल्याचे स्पष्ट झाले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून हवलदाराला अटक करण्यात आलेली आहे. पोलीस उपाधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे .


शेअर करा