शेअर ट्रेडिंगच्या नादात पुण्यातील एका युवकाने , अवघ्या दीड महिन्यात तब्बल.. 

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक असा फसवणुकीचा प्रकार समोर आलेला असून शेअर ट्रेडिंगच्या नादात पुण्यातील एका युवकाने अवघ्या दीड महिन्यात तब्बल 22 लाख रुपये गमावलेले आहेत  . हडपसर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 

उपलब्ध माहितीनुसार , मयूर अरविंद मकवाना ( वय 36 वर्ष राहणार हडपसर ) असे फिर्यादी व्यक्ती यांचे नाव असून सायबर भामट्यांनी त्यांना व्हाट्सअपवरून संपर्क केलेला होता. शेअर मार्केटमध्ये पैसे लावल्यानंतर तुम्हाला मोठ्या प्रमाणात परतावा मिळवून देऊ असे आमिष त्यांना दाखवण्यात आले आणि त्यानंतर त्यांनी टप्प्याटप्प्याने आरोपींनी सांगितलेल्या व्हाट्सअप लिंकवर क्लिक करून रक्कम जमा केली. 

सायबर पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून व्हाट्सअप ग्रुपवरील मोबाईल नंबर , बँक खातेदार यांच्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक यांनी तपासाला सुरुवात केलेली आहे. 

पुण्यात गेल्या काही महिन्यांपासून शेअर मार्केट , बिटकॉइन ट्रेडिंग याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे प्रमाण वाढलेले असून पोलिसांकडून अनेकदा आवाहन केल्यानंतर देखील नागरिकांकडून आर्थिक मोहापोटी दुर्लक्ष करण्यात येते मात्र अखेर त्यांना पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवावे लागतात.


शेअर करा