जेईई दुसऱ्या सत्राची परीक्षा चार तारखेपासून , ऍडमिट कार्डसाठी ही वेबसाईट 

शेअर करा

राष्ट्रीय परीक्षा एजन्सी अर्थात एनटीएकडून घेण्यात येणारी दुसऱ्या सत्रातील जेईई परीक्षा आता चार एप्रिलपासून सुरू होणार आहे. देशातील विविध शिक्षण संस्थामधील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जेईई मेन ही परीक्षा एनटीएमार्फत दरवर्षी जानेवारी आणि एप्रिल या दोन सत्रांमध्ये घेतली जाते. 

जेईई ही परीक्षा 319 शहरांमध्ये चार , पाच , सहा , आठ ,नऊ एप्रिलला होणार असून या कालावधीत परीक्षा सकाळी नऊ ते दुपारी बारा आणि दुपारी तीन ते संध्याकाळी सहा अशा दोन सत्रात होणार आहे. बी आर्क आणि बी प्लॅनिंग या अभ्यासक्रमासाठी 12 एप्रिल रोजी ही परीक्षा सकाळी नऊ ते दुपारी साडेबारा या कालावधीत घेतली जाणार आहे. अधिक तपशील https://jeemain.nta.ac.in/ या वेबसाईटवर ऍडमिट कार्ड मिळू शकेल. 


शेअर करा