शेअर मार्केटच्या नावाखाली चक्क गुरुजींनी फसवलं , शिक्षक अखेर निलंबित

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक असा फसवणुकीचा प्रकार समोर आलेला असून दाम दुप्पट आणि शेअर मार्केटच्या नावाखाली आत्तापर्यंत सायबर टोळ्याच नागरिकांना अडकवायच्या मात्र चक्क यामध्ये एका प्राथमिक शिक्षकाचे देखील नाव आलेले आहे. आरोपी शिक्षक हा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असून प्रकरण समोर आल्यानंतर त्याला निलंबित करण्यात आलेले आहे.

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील ठोंबरेवाडी येथील ही घटना असून प्राथमिक शिक्षक म्हणून काम करणारा अनिल केराप्पा लांडगे असे निलंबित करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. लांडगे यांनी केलेल्या फसवणुकीच्या विरोधात रुपेश दत्तात्रय काळे ( राहणार कोल्हापूर ) यांनी सांगली जिल्हा परिषदेकडे तक्रार केलेली होती. त्या तक्रारीची गंभीरता लक्षात घेत स्थानिक चौकशी अहवाल मागवण्यात आला आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

आरोपी लांडगे यांनी अधिक पैसे मिळवून देण्याच्या बहाण्याने तक्रारदार असलेले रुपेश काळे यांची फसवणूक केलेली होती . पंढरपूर तालुक्यातील अभिजीत देशमुख नावाच्या एका व्यक्तीने देखील याच शिक्षकाच्या विरोधात तक्रार दिलेली असून कार्यालयीन तसेच शालेय कामकाजामध्ये अनियमित्ता केल्याचा देखील ठपका या शिक्षकांवर ठेवण्यात आलेला आहे. प्राथमिक शिक्षक असलेले लांडगे यांनी शेअर बाजार व्यवहार करण्यासाठी त्यांची पत्नी आणि नितीन शिवाजी कारंडे यांच्या मदतीने कंपन्या स्थापन केल्या आणि त्यामध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने नागरिकांची फसवणूक केली असा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आलेला आहे.


शेअर करा