दारू जास्त झाली म्हणून राहुरी पोलिसांना फोन , आरोपीवर गुन्हा

शेअर करा

काही जणांना दारू पिल्यानंतर आपण काय करतोय कुणाशी बोलतोय याचे काहीही भान राहत नाही त्यातून अनेकदा पोलिसांना देखील त्रास देण्याचे प्रकार घडतात . काहीही कारण नसताना उगाचच 112 नंबरवर फोन करून हिंदू मुस्लिम दंगल झाल्याचा फोन करण्याचा प्रकार एका व्यक्तीला चांगलाच अंगलट आलेला असून राहुरी पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , मनोज सुनील डोंगरे असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव असून 16 ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजता पासून तर 17 ऑक्टोबर रोजी सकाळी आठवाजेपर्यंत पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद ढाकणे यांना 112 नंबरची ड्युटी होती . राहुरी पोलीस स्टेशनला ते हजर असताना रात्री नऊच्या सुमारास मनोज याने पोलिसांना फोन करून परिसरातील कराळे वस्ती शिवाजी चौक इथे हिंदू मुस्लिम दंगल झालेली आहे . दीडशे ते 200 लोक जमलेले आहेत अशी माहिती दिली.

पोलिसांनी तात्काळ या फोनची दखल घेत आपले पथक तिथे पाठवले त्यावेळी परिसरात सर्वत्र शांतता होती. आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली असता असा काहीही प्रकार झालेला नाही असे सांगण्यात आले त्यावेळी हा फेक कॉल असल्याचे लक्षात आल्यानंतर मनोज डोंगरे याला या संदर्भात विचारणा करण्यात आली त्यावेळी त्याने कोणतीही हिंदू मुस्लिम दंगल झालेले नाही मी दारू पिल्याने 112 ला माहिती दिलेली आहे असे उत्तर त्यांनी दिले.

आरोपीने पोलिसांची फसवणूक करून सरकारी वेळ वाया घालवला सोबतच पथकाला देखील त्रास देण्याच्या उद्देशाने खोटी माहिती दिली म्हणून आरोपीच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 177 प्रमाणे पोलीस कॉन्स्टेबल आदिनाथ नामदेव चेमटे ( वय 28 वर्ष नेमणूक राहुरी पोलीस स्टेशन ) यांनी फिर्याद दिलेली असून आरोपी मनोज डोंगरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .


शेअर करा