काही काम धंदा न करणारे हिरो चित्रपटात , जावेद अख्तर यांनी व्यक्त केली खंत 

शेअर करा

बॉलीवूड चित्रपट आता पूर्वीसारखे राहिलेले नाहीत अशी खंत अनेकदा अनेक जुने जाणते अभिनेते तसेच लेखकही व्यक्त करतात. पूर्वीच्या चित्रपटांमध्ये असलेला नायक हा व्यवस्थेशी संघर्ष करणारा असायचा मात्र दुर्दैवाने विद्यमान परिस्थितीत असे चित्रपट दिसून येत नाहीत . चित्रपटसृष्टीतील गीतकार जावेद अख्तर यांनी याविषयी खंत व्यक्त करत ओपन मार्केटच्या काळात जीवन हे पॅकेज बनलेले आहे . त्यात चांगले वाईट सर्व आहे मात्र कोणते स्वीकारायचे आणि कसे जगायचे याचा विचार करण्याची गरज आहे असे मत छत्रपती संभाजीनगर अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात व्यक्त केलेले आहे. 

जावेद अख्तर म्हणाले की , ‘ पूर्वी देशात समाजवादी विचार होता त्याचे प्रतिबिंब समाजात उमटायचे. आता ओपन मार्केट आणि लिबरलायझेशनचा काळ आहे. जगताना सापशिडीचा खेळ सुरू आहे या खेळामध्ये आपल्यासाठी आपल्या लोकांसाठी आणि समाजासाठी कुठल्या पातळीपर्यंत आपण जगत आहोत याचा विचार केला पाहिजे. 

आजकालचे चित्रपट हे सामाजिक विषयांपासून दूर झालेले आहे. वर्किंग क्लासचे हिरो राहिलेले नाहीत तर श्रीमंत घरातील काही काम धंदा न करणारे हिरो चित्रपटात दिसू लागलेले आहेत . पूर्वीच्या चित्रपटातील हिरोंचा लढा हा प्रस्थापित व्यक्तींच्या विरोधात असायचा. समाजातील जे लोक नाखूष असायचे ते देखील प्रस्थापितांच्या विरोधात असायचे मात्र आता नाखूष राहण्याला काही अर्थ राहिलेला नाही आणि बंड केल्याचा काही फायदाही दिसून येत नाही , ‘ अशी देखील खंत त्यांनी यावेळी व्यक्त केलेली आहे. 


शेअर करा