मनोज जरांगे पाटील यांनी दिली ‘ ही ‘ तारीख ,  प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून..

शेअर करा

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्रभर जनजागृती करण्यास सुरुवात केलेली आहे . 24 तारखेला अंतरवाली सराटी येथे सभेचे आयोजन करण्यात आले त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी , ‘ मराठा समाज बांधवांनी गावागावात चर्चा करून जिल्हा स्तरावर एकाच व्यक्तीची निवड करावी आणि त्याची यादी सादर करावी . 30 मार्चला बैठक घेऊन लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात अपक्ष म्हणून एका उमेदवाराच्या नावावर चर्चा करू आणि त्यानंतर त्यांची नावे जाहीर करू ‘  असे स्पष्टपणे सांगितले आहे. प्रत्येक गावातून दोन उमेदवार देण्याचा निर्णय यामुळे बारगळलेला दिसून येत आहे. 

अंतरवाली सराटी येथे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की , ‘ मराठी गाफिल राहिले पाहिजेत अशी शासनाची भूमिका आहे. अनेकदा सरकारला संधी दिली मात्र उपयोग झालेला नाही. सगेसोयरे अध्यादेशाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. राज्यात आंदोलन झाल्यानंतर 57 लाख जणांच्या कुणबी नोंदी मिळाल्या.

अर्ज करणाऱ्या व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यास आजही विलंब केला जात आहे. कुणबी नोंदणीसाठी शिंदे समितीची स्थापना करण्यात आलेली होती ही समिती काय करते हे कळत नाही.  मराठा आरक्षणासाठी आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन शासनाने दिलेले होते मात्र प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. सत्तेचा गैरवापर सुरू करण्यात आलेला असून दडपशाही कदापि सहन केली जाणार नाही. 

मनोज जरांगे पाटील यांनी सभेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना , ‘ गृहमंत्री समाजाला वेड्यात काढत आहेत. ज्यांना सावलीत बसवलं त्यांना समाजाचा उन्हात बसवणार आहे. दहा टक्के आरक्षण समाजाला मान्य नाही. राजकारण हा माझा मार्ग नाहीतर जनआंदोलनावर माझा विश्वास आहे. लोकसभेपेक्षा विधानसभेत आपले आरक्षणाचा विषय आहे. लोकसभेसाठी अनेक उमेदवार उभे केले तर मतांची विभागणी होईल त्यामुळे अपक्ष म्हणून जिल्हास्तरीय पातळीवर एकच उमेदवार देण्यासाठी बैठकीत निर्णय घेण्यात आलेला असून ही नावे 30 तारखेला जाहीर करण्यात येतील , ‘ असे सांगण्यात आलेले आहे. 


शेअर करा