केजरीवाल यांच्या राजीनाम्यासाठी उत्साही भाजप कार्यकर्त्यांना न्यायालयाने खडसावलं

शेअर करा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या ईडीच्या कोठडीत असून एक एप्रिलपर्यंत त्यांची ईडी कोठडीची मुदत वाढवण्यात आलेली आहे. 21 मार्च रोजी केजरीवाल यांना अटक करण्यात आलेली होती . 

केजरीवाल यांनी न्यायालयात बोलताना , ‘ ईडीची इच्छा हीच मुळात आपल्याला केवळ अटक करण्याची आहे ‘ असे म्हणत अत्यंत चुकीच्या आधारावर मला अटक करण्यात आलेली आहे. ईडीकडे कुठलेही पुरावे नाहीत. गेल्या दोन वर्षांपासून ईडी याप्रकरणी चौकशी करत आहे मात्र तपास संस्थेला कुठला गैरव्यवहार सिद्ध करता आलेला नाही. माझ्या सहकाऱ्यांना देखील अटक करण्यात आली आणि काही व्यक्तींच्या निवेदनात केवळ माझे नाव आले त्याच आधारावर मला अटक करण्यात आलेली आहे , ‘ असे म्हटले आहे. 

केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर फटाके फोडणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना मात्र न्यायालयाने चांगल्याच कानपिचक्या दिलेल्या आलेल्या असून भाजप कार्यकर्त्यांनी ‘ ईडीने अटक केल्यानंतर कोठडीतून राज्यकारभार चालवला जाऊ शकत नाही म्हणून त्यांचा राजीनामा घ्यावा ‘ अशी मागणी केलेली होती त्यावर न्यायालयाने एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा किंवा नाही याबाबत न्यायालय निर्णय देऊ शकत नाही असे स्पष्ट उत्तर दिलेले आहे.


शेअर करा