राजूरची ‘ गांजा गॅंग ‘ पोलिसांनी केली गजाआड, चौकशीत ‘ अशा ‘ गोष्टींची कबुली की..

शेअर करा

राजूर प्रतिनिधी,ललित मुतडक: मागील काही दिवसापासुन राजुर परिसरात घरगुती वापराच्या वस्तु तसेच विविध मोटार गाडयांच्या बॅट-या चोरुन नेण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने मा.पोलीस अधिक्षक अहमदनगर यांनी सदर चोरी बाबत सखोल तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार राजुर पोलीस स्टेशन चे सहा. पोलीस निरीक्षक, श्री. नरेंद्र साबळे, पोकॉ फटांगरे व इतर स्टाफ यांनी रात्रगस्त करीत असतांना सुदाम सखाराम बादड, रा. पाचनई, ता. अकोले यांने चोरीची बॅटरी घेवुन त्याचे घरात लपवुन ठेवलेली असल्याची माहिती मिळाली

त्यानुसार त्याची घरझडती घेतली असता त्याचेकडे चोरीची बॅटरी मिळुन आली. त्याचेकडे विचारपुस करून पोलिसी हिसका दाखवला असता त्यांने आणखी त्याचे सहकाऱ्यांची नावे सांगितली त्यानुसार समिर विठल भारमल (रा. पाचनई, ता. अकोले), अजय उर्फ लाला विष्णु भांगरे,दिलीप विष्णु भांगरे, मचिंद्र बुधा डोंगिरे ,मिलींद भिमा मडके, अनिल भिमा मडके सर्व रा. राजुर, ता. अकोले या सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनी राजुर व परिसरातुन वेळोवेळी चो-या केल्याची कबुली दिली. त्यांचेकडुन एक आयशर टेम्पोची बॅटरी, एक टॅक्ट्रर ची बॅटरी, एक ताब्यांचा पाणी गरम करण्याचा बंब , एक सोलर पॅनल ची प्लेट, तसेच चोरी करण्याकरीता वापरलेले वाहने -सिल्वरं रंगाची मारुती व्हॅन (क्रमांक MH-05 AJ-6662 )असा एकुण 2,50,000/- रु किंमतीचा मुद्देमाल त्यांचेकडुन जप्त करण्यात आला आहे.

आपले गावात किंवा परिसरात कोठेही संशयीत व्यक्ती दिसुन आल्यास तसेच चोरी करणाऱ्या व्यक्ती/टोळी बाबत काही एक माहिती असल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला कळवावे आपले नाव गुप्त ठेवण्यात येईल. असे आवाहन राजूर पोलिसांनी पोलिसांनी केले आहे. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील अपर पोलीस अधिक्षक,उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि,नरेंद्र साबळे,पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार,पोहेकॉ कैलास नेहे,विजय मुंढे,पोकॉ.अशोकगाडे,मपोना वाडेकर,पो.कॉ.फटांगरे,पो.कॉ.वरपे, ढाकणे, चा।पो ना पांडुरंग पटेकर यांनी केली.


शेअर करा