इरादा पक्का तर..गुजरातच्या जीवूबेनचा ‘ असा ‘ विक्रम की ?

शेअर करा

आई होणे हे सर्व महिलांसाठी भाग्याचे असते. अनेकांना व्यंधत्व किंवा अन्य काही कारणांमुळे मूल होत नाही आणि त्यामुळे समाजातून त्यांना टोमणे देखील ऐकावे लागतात मात्र गुजरातमध्ये एक आश्चर्यकारक प्रकार घडला असून एका 70 वर्षीय महिलेची 45 वर्षांपासून आई होण्याची इच्छा पूर्ण झाली आहे. जगातील सर्वाधिक वयात ती आई झाल्याचा दावा या महिलेने केला आहे .

गुजरातमध्ये सध्या जीवूबेन आणि तिचा पती मालधारी (75) हे सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. दोघांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांचा मुलगा समाजमाध्यमांना दाखवला आहे . सदर दाम्पत्याने आयव्हीएफद्वारे मुलाला जन्म दिला आहे. ते कच्छच्या छोट्याशा गावात मोरामध्ये राहणारे आहेत. एवढ्या वर्षांनी पाळणा हलल्याने कुटुंब आणि नातेवाईकांत आनंदाचे वातावरण आहे.

जीवूबेन आणि मालधारी यांचे लग्न 45 वर्षांपूर्वी झाले होते. मात्र त्यांना मूल झाले नव्हते. आयव्हीएफ करणारे डॉ. नरेश भानुशाली यांनी त्यांना या वयात आयव्हीएफद्वारे मूल जन्माला घालण्यातील अडचणी आणि धोके सांगितले तसेच या वयात मुलाला जन्म देणे कठीण असल्याचे म्हटले होते. मात्र दांम्पत्याने विज्ञानावर विश्वास ठेवला आणि अशक्य गोष्ट शक्य केली. जीवूबेन यांनी जगातील सर्वात वयस्कर माता असल्याचा दावा केला असून त्यांच्या पतीची देखील त्यांना खंबीर साथ मिळाली म्हणून हे शक्य झाले असेही त्या म्हणाल्या आहेत.


शेअर करा