नात्याला काळिमा..बायकोवर बलात्कार होत असताना पती बनला ‘ चौकीदार ‘, महाराष्ट्रातील घटना

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असून अशीच एक घटना हिंगोली तालुक्यात समोर आली आहे. नात्यांना शर्मसार करणाऱ्या या घटनेत आरोपी पतीने चक्क आपल्या मित्राला पत्नी घरी एकटी असताना पाठवले आणि तिच्यावर अत्याचार करण्याचे सांगितले हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील सवड येथे गुरुवारी आरोपी व्यक्तीची पत्नी रात्री दहा वाजता घरात एकटी असताना पतीने त्याचा मित्र असलेल्या एका व्यक्तीला स्वतःच्या घरी पाठवले आण आणि पत्नीवर अत्याचार करण्यास त्याला मदत केली असा ठपका ठेवत पती आणि त्याच्या मित्रावर हिंगोली ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सवड येथील ही महिला गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास घरी एकटीच होती त्यावेळी फिर्यादी महिलेचा पती तिथे माधव जोगदंड ( पतीचा मित्र ) नावाच्या व्यक्तीला घेऊन आला आणि तो घराच्या बाहेर थांबला तर माधव याला त्याने घरात पाठवले. माधव याने चाकूचा धाक दाखवत फिर्यादी आणि तिच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिच्यावर जबरी अत्याचार केला.

धक्कादायक बाब म्हणजे यावेळी तिचा पती चौकीदार बनून बाहेर बसून होता असे पीडित महिलेचे म्हणणे आहे . फिर्यादी महिलेने याआधी देखील पतीने आपल्या चारित्र्यावर संशय घेऊन अनेकदा मानसिक त्रास दिला आहे असे देखील म्हटले आहे. सदर प्रकरणाचा पोलिस तपास करत असून परिसरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे .


शेअर करा