संतापजनक..शिक्षकी पेशाला काळिमा फासत पत्नीसोबत क्रूरतेचा कळस

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना समोर आलेली असून दारुच्या व्यसनामुळे पती-पत्नीमध्ये सतत उडणारे खटके अखेर पत्नीच्या खुनात रूपांतरीत झालेले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली असून पत्नीच्या चारित्र्याबाबत पतीच्या मनात संशय तयार झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे सदर पती हा शिक्षक असून त्याने पत्नीच्या गुप्तांगावर वार करत तिचा खून केला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी शहरात स्वामी समर्थ नगरमध्ये रविवारी दुपारी ही घटना घडली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, मारोती विठ्ठल आरके ( वय 35 ) असे पतीचे नाव असून पत्नीचे नाव विमल मारुती आरके (वय ३० ) असे आहे. आरोपी हा एका शाळेत शिक्षक असून त्याचा विमल यांच्यासोबत विवाह झाला होता. त्यांना दोन मुले देखील असून दरम्यानच्या काळात मारोती याला दारूचे व्यसन जडले आणि पत्नीच्या चारित्र्याबाबत त्याने संशय घ्यायला सुरु केले.

आपण शाळेत गेल्यावर आपली पत्नी दुसऱ्या सोबत फिरायला जाते असा त्याच्या मनात संशय होता त्यातून त्यांचे नेहमी भांडणे होत असत. अशीच रविवारी त्या दोघांची भांडणे झाली आणि मारोती याने विमलच्या गुप्तांगावर चाकूने वार केले. विमल रक्तबंबाळ झाल्यानंतर आरडाओरडा सुरू झाला.

विमल यांना सुरुवातीला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले मात्र तरीही रक्तस्राव थांबत नसल्याने यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात देखील नेण्यात आले मात्र उपचार सुरू असतानाच रात्री अडीच वाजता त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी गाठत आरोपी मारुती याला अटक केली असून विमलची आई जयंतीबाई यांनी जावयाच्या विरोधात फिर्याद दिलेली आहे.


शेअर करा