मालक कोरोनाबाधित असताना व्यवस्थापकाने ‘ कामच दाखवले ‘ , आता प्रकरण पोलिसात

शेअर करा

कोरोना काळात सर्व उद्योग धंदे ठप्प झाले होते. अनेक जण अंगावर कोरोनाचे दुखणे घेऊन दवाखान्यात देखील ऍडमिट होते या काळात बहुतांश लोकांनी आपल्याकडे काम करणाऱ्या व्यक्तींवर विश्वास दाखवून व्यवसायाची सूत्रे त्यांच्या हातात सोपवली होती मात्र त्यातून फसवणूक केल्याची घटना नगर येथे समोर आलेली असून व्यापारी कोरोनामुळे आजारी असताना त्याच्या तीन लाख 65 हजार रुपयांच्या मालाची परस्पर विल्हेवाट लावण्यात आलेली आहे. नगर येथे ही घटना उघडकीला आली असून सचिन प्रेमानंद पाडळे ( राहणार प्रकाश कॉलनी नगर ) यांची व्यवस्थापकाने फसवणूक केलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पाडळे यांचे एमआयडीसीमध्ये एक दुकान आहे. त्यांना 2021 मध्ये कोरोनाची बाधा झालेली होती त्यावेळी त्यांनी आपला व्यवस्थापक असलेला बापू दगडू पवार यांच्याकडे व्यवसायाची सूत्रे दिली आणि पाडळे ऑगस्ट 2021 पर्यंत दुकानात आले नाही. व्यवस्थापक पवार याने पांढरे यांचा विश्वास संपादन करून पत्नी शोभा आणि मुलगा महेश यांना हाताशी धरत दुकानातील 3 लाख 65 हजार रुपयांचा माल विकला अन त्यांची फसवणूक केली.

सदर प्रकारणी बापू दगडू पवार, त्याची पत्नी शोभा बापू पवार, मुलगा महेश बापू पवार ( सर्वजण राहणार निंबळक तालुका नगर ) यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


शेअर करा