भारत जोडो यात्रा ‘ ह्या ‘ तारखेला होणार महाराष्ट्रात दाखल , 3500 किमीचा प्रवास अन..

शेअर करा

काँग्रेस पक्षाने आजपासून भारत जोडो यात्रेला प्रारंभ केलेला असून देशात एकतेचा संदेश काढणारी भारत जोडो यात्रा ही कोणाची मन की बात नाही तर यामध्ये जनतेचे प्रश्न आणि विचार मनमोकळ्या पद्धतीने ऐकून घेतले जाणार आहेत असे सांगितले आहे. काँग्रेसने ‘ भारत जोडो ‘ यात्रेसाठी एक गीत बनवलेले असून ‘ एक तेरा कदम एक मेरा कदम ‘ असे या गीतांचे बोल आहेत.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन भारत जोडो यात्रेसाठी हे गीत जारी केलेले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी या यात्रेविषयी बोलताना भारत जोडो यात्रा ही कोणाची मन की बात नाही तर त्यामध्ये जनतेचे प्रश्न चिंता आणि त्यांच्या मागण्या यांना स्थान देणार आहोत असे सांगितले आहे.. जनतेचे म्हणणे खऱ्या अर्थाने दिल्लीपर्यंत पोहोचविण्याचा यात्रेचा हेतू असून यात लांबलचक भाषण देणार नसून जनतेचे म्‍हणणे ऐकून घेणार आहोत, असेही ते म्हणाले आहेत.

ज्या राज्यातून भारत जोडो यात्रा जाणार नाही तिथे 75 ते 100 किलोमीटरची सहाय्यक यात्रा काढण्यात येईल तसेच भारत जोडो यात्रेचे नेतृत्व हे एकटे राहुल गांधी करणार नसून इतरही 118 भारत यात्री या यात्रेत सहभागी होणार आहेत . लोकशाहीनुसार काँग्रेस पक्ष वाटचाल करत असून पक्षात सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले जाते एकाधिकारशाही पक्षात चालत नाही असे देखील जयराम रमेश पुढे म्हणाले. सुमारे पस्तीस किलोमीटर लांब अशी ही भारत जोडो यात्रा आजपासून सुरू झालेली आहे.

देशात वाढलेली महागाई आणि बेरोजगारी तसेच माध्यमांकडून करण्यात येत असलेले धार्मिक ध्रुवीकरण याच्याविरोधात ही यात्रा असून 7 नोव्हेंबर रोजी ही यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. कॉंग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील यात्रा नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे 7 नोव्हेंबरला प्रवेश करेल आणि पुढील सोळा दिवस महाराष्ट्रातून सुमारे 383 किलोमीटरचे अंतर पार करेल अशी माहिती देण्यात आलेली आहे.

राहुल गांधी यांनी मागील आठवड्यात विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे . संसदेत आम्ही महागाई आणि बेरोजगारी या विषयावर बोलण्यास सुरू केल्यानंतर आमचे माइक बंद केले जातात आणि जनतेपर्यंत आमचा आवाज पोहोचला जाणार नाही अशा पद्धतीची बंधने घालण्यात येत आहेत. देशातील प्रसारमाध्यमे हीच आता उद्योग दोन उद्योगपतींच्या हातात असून त्यामुळे जनतेपर्यंत पोहोचण्याचा आमचे सर्व मार्ग बंद झाले आहेत म्हणून आता रस्त्यावर येऊन नागरिकांच्या समस्या आम्ही केंद्र सरकारला निदर्शनास आणून देणार आहोत याच उद्देशाने भारत जोडो यात्रा सुरू करण्यात आलेले आहे असे सांगण्यात आलेले आहे.


शेअर करा