दर्शन घेण्यासाठी आलेला व्यक्ती चक्क नंदीत अडकला , पहा व्हिडीओ

शेअर करा

दर्शन घेण्यासाठी

देशात एक वेगळेच प्रकरण समोर आले असून एक व्यक्ती दर्शन घेण्यासाठी मंदिरात आला मात्र तो शिवमंदिरात नंदीच्या पाया पडला आणि त्यानंतर लठ्ठ असलेला हा व्यक्ती नंदीच्या पायाखाली शिरला मात्र लठ्ठ असल्याकारणाने मूर्तीखाली अडकून पडला. त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असून अद्यापपर्यंत त्याला बाहेर काढण्यात आलेले नाही.

उपलब्ध माहितीनुसार, नंदी हा भगवान शंकर यांचे वाहन म्हणून ओळखला जातो त्यामुळे प्रत्येक शिवमंदिरात नंदीची मूर्ती असते. नंदीसमोर सुरुवातीला नतमस्तक व्हायचे असते मात्र या व्यक्तीने उत्साहाच्या भरात चक्क नंदीच्या शरीराखालून जाण्याचा त्याने प्रयत्न केला मात्र नंदी खालून जाण्याचा प्रयत्न करणारा हा व्यक्ती लठ्ठ असल्याकारणाने मूर्तीतच अडकून पडला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बहुजन शेरणी नावाचे अकाउंट असलेल्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आलेला आहे.


शेअर करा