मॅडम आहेत का उडून गेल्या , गोदी रिपब्लिकच्या ‘ ह्या ‘ मॅडमच्या व्हिडिओमागील गोष्ट

शेअर करा

गोदी मीडियाच्या बकेटमधील चॅनेल असलेला रिपब्लिक टीव्ही यावर वृत्तांकन सुरू असताना एका महिला अँकरचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत असून समुद्रात आलेले बिपरजोय वादळ किती तुफानी आहे हे दाखवताना चक्क रिपब्लिक टीव्हीची छत्री घेऊन स्टुडिओमध्येच जोरदार वादळ आल्याचा अप्रतिम अभिनय या महिला अँकरने केलेला होता त्यानंतर सोशल मीडियात या महिलेची जोरदार चर्चा सुरू असून सदर अँकरचे नाव पंडित श्वेता त्रिपाठी असे असल्याची माहिती आहे.

सदर न्यूज अँकर ह्या उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील रहिवासी असून इंग्रजी माध्यमातून या न्यूज अँकरचे शिक्षण एका ख्रिश्चन शाळेमध्ये झालेले आहे त्यानंतर गोदी मीडियात त्यांनी काम केलेले असून लाईव्ह इंडिया , झी हिंदुस्तान या चॅनलवर याआधी काम केलेले आहे आणि दुर्दैवाने हे दोन्हीही चॅनेल बंद झाले अन त्यानंतर काही कालावधीत रिपब्लिक टीव्हीवर त्यांची न्यूज अँकर आणि पत्रकार म्हणून नेमणूक झालेली आहे.

रिपब्लिक टीव्हीवर याआधी देखील अशाच स्वरूपाचे अनेक कार्यक्रम समोर आलेले असून ज्यामध्ये सुशांत सिंग राजपूत प्रकरणात एकाच जागेवर फिरक्या घेत सनसनाटी निर्माण करण्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता. सदर न्यूज अँकर यांनी त्यानंतर दीपिका पदुकोण हिच्या गाडीचा पाठलाग करत तुम्ही ड्रग घेता का ? असे देखील विधान केलेले होते . सुशांत सिंग राजपूत प्रकरणात अधिकाऱ्यांना देखील याच महिलेने अर्थहीन प्रश्न विचारत भंडावून सोडले होते.

देशात सध्या बिपरजोय चक्रीवादळ आलेले असून यासंदर्भात वृत्तांकन करताना काहीतरी सनसनाटी करून चॅनलला दर्शक मिळावेत म्हणून टिकटॉकर पद्धतीने मॅडमने असा अभिनय केलेला आहे. सदर न्यूज अँकरचा व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत असून तिच्या या व्हिडिओवर ‘ बरे झाले स्टुडिओत तुफान आले नाही तर मॅडम उडून गेल्या असत्या ‘ अशा देखील प्रतिक्रिया येत आहेत. गोदी मीडियाने विश्वासार्हता गमावलेली असल्या कारणाने नागरिक हे चॅनल पाहतच नाही त्यामुळे असे प्रकार करून तरी आपले चॅनल पाहतील असा भाबडा आशावाद या चॅनलला दिसून येत आहे .


शेअर करा