सनातन धर्म सोडून प्रियकरासाठी बनली मुस्लिम, घरच्यांनी केले पिंडदान

शेअर करा

देशात एक प्रेमप्रकरण सध्या समोर आलेले असून प्रियकरासाठी एका मुलीने स्वतःचा धर्म बदलत मुस्लिम धर्म स्वीकारला आणि त्यानंतर त्या तरुणाशी लग्न केले मात्र त्यानंतर जे काही होईल याचा तिला अंदाज नव्हता. अनामिका दुबे असे तरुणीचे नाव असून मुस्लिम प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी तिने तिचे नाव उजमा फातिमा केले . संतप्त झालेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी अखेर जिवंतपणेच तिचे श्राद्ध घातलेले असून नातेवाईकांसह गावकऱ्यांना देखील तिच्या तेराव्याच्या जेवणाला बोलावलेले आहे. मध्य प्रदेशातील जबलपूर येथील ही घटना आहे.

उपलब्ध माहितीनुसार, जबलपूरच्या आमखेरा परिसरात राहणारी अनामिका दुबे ही मोहम्मद आयाज नावाच्या एका तरुणाच्या प्रेमात पडलेली होती त्यानंतर तिने धर्मांतर करत त्याच्यासोबत निकाह केला आणि तिचे नाव उजमा फातिमा ठेवले. मुलीने असे केल्यानंतर तिच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला आणि त्यांनी मुलीचा त्याग करण्याचा निर्णय केला त्यानंतर तिच्या निधनाच्या पत्रिका छापल्या आणि नर्मदा नदीच्या किनारी तिचे पिंडदान देखील केले. तरुणीच्या घरच्यांनी यावेळी नातेवाईकांना देखील तिथे बोलावलेले होते आणि आपल्याला आपली मुलगी मेलेली आहे असे सांगत उपस्थित व्यक्तींना त्यांनी भोजन देखील दिले . अनामिकाचे मामा नरेंद्र कुमार हे मुलीने घेतलेल्या निर्णयावर प्रचंड दुःखी आहेत.


शेअर करा