पोलिस ठाण्यात बकरीला बांधलं अन मालक आला तर.. , कोर्टात गेलं प्रकरण

शेअर करा

महाराष्ट्रात एक अजब प्रकार सध्या समोर आलेला असून छत्रपती संभाजीनगर येथील माजी महापौर यांचा बूट चोरीला गेल्यानंतर पूर्ण यंत्रणा कामाला लागल्याचा प्रकार समोर आलेला होता अशीच एक दुसरी घटना कन्नड तालुक्यातील पिशोर इथे समोर आलेली असून पिशोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाडाचा पाला खाल्ल्यामुळे पोलिसांनी चक्क बकरीला ताब्यात घेऊन दिवसभर बांधून ठेवलेले होते आणि संध्याकाळी या बकरीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता . कोर्टात प्रकरण गेल्यानंतर कोर्टाने देखील या मालकाला दोन हजार रुपयांचा दंड सुनावला आहे . तीन हजार रुपयांची बकरी आणि दोन हजार रुपयांचा दंड असा दुहेरी फटका या मालकाला आता बसलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, राऊफ रजाक सय्यद असे या बकरी मालकाचे नाव असून सय्यद यांच्या बकरीने झाडाची पाने खाल्ल्यामुळे बकरीला पोलिसांनी बांधून ठेवलेले होते . दरम्यानच्या काळात सय्यद यांना आपली बकरी पोलिसांनी बांधून ठेवल्याची माहिती समजली आणि त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला होता कोर्टात प्रकरण गेल्यानंतर कोर्टाने देखील त्यांना दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे

राऊफ सय्यद यांनी याप्रकरणी नाराजी व्यक्त केलेली असून पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक अवैध धंदे सुरू आहेत त्यावर पोलीस कुठलीही कारवाई करत नाहीत मात्र फक्त पोटासाठी म्हणून बकरीने चारा खाल्ला म्हणून तिला डांबून ठेवण्यात आले आणि आपल्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला . कोर्टाने देखील यावेळी आपल्यालाच दंड ठोठावला आहे असे म्हणत नाराजी व्यक्त केलेली आहे.


शेअर करा