हेरंब कुलकर्णी यांच्यावर हल्ल्यासाठी दिली होती सुपारी , आणखी दोन जण ताब्यात

शेअर करा

नगर शहरात भर दिवसा शनिवारी सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर झालेला हल्ला हा पंधरा हजार रुपयांची सुपारी दिल्यानंतर करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे . आरोपींना पंधरा हजार रुपयांची सुपारी ही हेरंब कुलकर्णी यांना संपवण्यासाठी देण्यात आली होती की केवळ त्यांना मारहाण करण्याचा आरोपींचा उद्देश होता याचा देखील तपास सध्या सुरु आहे. पंधरा हजार रुपयांची सुपारी एखादा माणूस संपवून टाकण्यासाठी जर देण्यात आली होती तर नगर शहरात माणसाचा जीव किती स्वस्त झालेला आहे हे देखील या घटनेनंतर अधोरेखित झालेले आहे. सदर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय विष्णू सब्बन , चैतन्य सुनील सुडके यांच्यासोबत एक अल्पवयीन अशा तीन जणांना पोलिसांनी आधीच अटक केली होती तर सनी ज्ञानेश्वर जगधने वय २४ राहणार सर्जेपुरा आणि अक्षय कैलास माळी वय २० राहणार घासगल्ली अशी नव्याने अटक केलेल्या दोघांची नावे आहेत . सदर गुन्ह्यातील आरोपींची संख्या आता पाच झालेली आहे .

हेरंब कुलकर्णी जिथे मुख्याध्यापक आहेत त्या महाविद्यालयाच्या भोवती आरोपीपैकी अक्षय सब्बन याची पान टपरी होती . शाळेच्या आवारापासून अगदी जवळ ही पानटपरी असल्याकारणाने कुलकर्णी यांनी महापालिका कार्यालयात यासंदर्भात अर्ज केला आणि त्यानंतर महापालिकेने अक्षय सब्बन याची पानटपरी काढून टाकली होती त्याचा आरोपीच्या मनात राग होता. महापालिकेने तक्रारदार यांचे नाव गुप्त ठेवले असते तरी हा प्रकार टाळता आला असता मात्र महापालिका प्रशासनाने इथेही जबाबदारीचे भान दाखवले नाही.

शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास सर्व आरोपींनी हेरंब कुलकर्णी यांना रासने नगर परिसरात अडवून त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना लोखंडी रॉडने मारहाण केली.सदर घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील सोशल मीडियात व्हायरल झालेले असून त्यानंतर त्यांनी रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. पोलिसांनी आरोपींवर आता कलम 307 अर्थात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा देखील नोंदवलेला होता.

हेरंब कुलकर्णी हे नगर शहरातील एका महाविद्यालयात मुख्याध्यापक असून विद्यालयाच्या भिंतीला चिटकून असलेली एक पान टपरी हटवावी यासाठी त्यांनी महापालिका कार्यालयाकडे तक्रार केलेली होती आणि त्यानंतर महापालिकेने कारवाई केली . पान टपरीचा मालक असलेला अक्षय सब्बन याने त्याच्या मित्रांला सुपारी दिली आणि त्यानंतर पुढील घटना घडली.नगर चौफेर प्रतिनिधीने प्रत्यक्ष सदर महाविद्यालयाजवळ जाऊन माहिती घेतली असता आरोपी अक्षय याच्या कुटुंबीयांचा तिथे गाळा देखील आहे मात्र तरीदेखील शाळेच्या भिंतीला चिटकून तो पान टपरी चालवत होता. स्वतःचा गाळा असताना देखील त्याने वास्तविक असा प्रकार करण्याची काहीही गरज नव्हती असे मत इतर व्यावसायिकांनी व्यक्त केलेले आहे .


शेअर करा