नगरमध्ये ‘ सट्टा ‘ रंगात आला असतानाच पोलीस पोहचले अन..

शेअर करा

नगर शहरात सट्टेबाजीचा एक अद्भुत प्रकार शहरात समोर आलेला असून भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्यात पैसे लावून सट्टा खेळत असताना पोलिसांना पाहताच दोन जण पळून गेले मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका व्यक्तीला पकडलेले असून त्याच्याकडून 22 हजार रुपये रोख आणि एक मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , विशाल आश्विन आनंद ( वय 27 वर्ष राहणार पटवर्धन चौक नगर शहर ) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून पटवर्धन चौकात काही तरुण क्रिकेटवर सट्टा खेळत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय सूत्रांच्या माध्यमातून मिळालेली होती. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला आणि त्यानंतर छापा टाकला तेव्हा आरोपी पळून जाऊ लागले मात्र पाठलाग करून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलेले असून त्याच्या मोबाईलच्या आधारावर प्रकरणाचा पुढे तपास सुरू असल्याची माहिती आहे.


शेअर करा