पाच किडन्या विकायच्या आहेत , जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोस्टर

शेअर करा

महाराष्ट्रात सध्या अवैध सावकारीने धुमाकूळ घातलेला असून सावकारांनी कर्ज वसुलीसाठी सगळ्या मर्यादा पार केल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी सावकाराच्या त्रासाला वैतागून गोरगरीब नागरिकांनी आत्महत्या केलेले आहेत मात्र महाराष्ट्राचे बळी घेणाऱ्या या ज्वलंत प्रश्नाकडे लक्ष द्यायला सरकारला सध्या वेळ राहिलेला नाही अशा परिस्थितीत नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर भिंतीवर लावलेली एक जाहिरात सध्या चांगलीच चर्चेत आलेली आहे.

कोरोना काळात सावकाराकडून दोन लाख रुपये घेतले त्यापेक्षा अधिक पैसे देऊन देखील त्रास वाढत गेलेला आहे . त्यांना घाबरून आम्ही मुंबईला निघून गेलो पण आता पुन्हा गावी येऊन शेती करायची आहे पण सावकार पैशासाठी त्रास देईल म्हणून आता सावकाराला पैसे देण्यासाठी पाच किडन्या विकायच्या आहेत अशी जाहिरात एका कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर चिटकवली आहे व मोबाईल नंबर देखील दिलेला आहे.

मुदखेड तालुक्यातील वाईवरदड येथील हे कुटुंब असून सावकाराकडून होत असलेल्या जाचामुळे आम्ही मुंबई गाठलेली होती मात्र आता आम्हाला गावात जाऊन शेती करायची आहे. सावकार मागेल तेवढे पैसे द्यायचे आहेत मात्र आमच्या पाच मुलांपैकी ज्याची किडनी कुणाला फिट बसत असेल त्यांना ती विकायची आहे असे या त्यांनी म्हटलेले आहे.


शेअर करा