तू काळी आहेस म्हणून , लग्न झाल्यावर जावईबापूला साक्षात्कार झाला अन..

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक असा प्रकार पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील माळेगाव इथे समोर आलेला असून चार चाकी गाडी आणि घर खरेदीसाठी तू माहेरून दहा लाख रुपये घेऊन ये यासाठी विवाहितेचा छळ करण्यात आलेला आहे . माळेगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार , 20 ऑक्टोबर 2020 पासून 16 सप्टेंबर 2023 पर्यंत हा प्रकार वेळोवेळी घडलेला असून फिर्यादी महिला कोमल दत्तात्रय मोटे ( वय 25 ) यांनी या प्रकरणी पोलिसात फिर्याद दिलेली आहे. आपले सासरे उल्हास निवृत्ती मोठे सासू माया उल्हास मोटे आणि पती दत्तात्रय उल्हास मोटे ( राहणार नवी लोटेवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर ) यांनी माहेराहून पैसे घेऊन येण्यासाठी दहा लाख रुपये आणण्यासाठी आपल्याला त्रास देण्यास सुरू केलेले होते. तिन्ही जणांनी संगनमताने माझा शारीरिक आणि मानसिक छळ केलेला आहे अशी फिर्याद त्यांनी पोलिसात दिलेली आहे.

पती असलेला आरोपी दत्तात्रय याने तू काळी आहेस त्यामुळे मला तू आवडत नाहीत असे म्हणत फिर्यादी महिला यांना वेळोवेळी मानसिक त्रास देखील दिला तसेच त्यांना उपाशी देखील ठेवले असे तक्रारीत म्हटलेले आहे. माळेगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.


शेअर करा