मराठा आंदोलक म्हणाले , सरकारने खात्याचा नंबर द्या आम्ही किडन्या विकून..

शेअर करा

महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणावरून मराठा बांधव संघर्षाला सुरुवात करणार असून याआधी झालेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सरकारी मालमत्तेचे नुकसान झाल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत आहे अर्थात ही तोडफोड किंवा सरकारी नुकसान कोणी केले हा देखील संभ्रम असून नुकसानीचा आकडा सुमारे अकरा कोटींच्या घरात असल्याचा तर्क सरकारने काढलेला आहे. समाज सकल मराठा समाजाच्या बांधवाने अकरा कोटींची नुकसान भरपाई आमच्यापैकी 111 मराठा बांधव आमची किडनी विकून देणार आहेत , असे म्हटलेले आहे.

छत्रपती संभाजीनगर इथे सकल मराठा समाजाच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली होती त्यामध्ये मराठा आंदोलना दरम्यान शेकडो बांधवांवर गुन्हे दाखल करण्यात आले मात्र ते मागे घेण्यात आले नाहीत . समाजाने 1982 पासून आपल्या न्याय हक्कासाठी शांततेच्या मार्गाने लढा सुरू केलेला असून जगभरात लाखोंचे मोर्चे काढले. 50 पेक्षा जास्त जणांनी बलिदान देखील दिले मात्र तरी देखील सरकारने आरक्षणाचा शब्द पूर्ण केलेला नाही असे म्हटलेले आहे .

आता राज्यात पेटलेल्या मराठा आंदोलनादरम्यान नुकसान भरपाई म्हणून 11 कोटी रुपयांचा आकडा सरकारकडून सांगण्यात येत आहे. सरकारची ही नुकसान भरपाई आम्ही आमच्या किडन्या विकून देऊ अशी भूमिका आता मराठा आंदोलकांनी घेतलेली असून सरकारने फक्त बँक खात्याचा नंबर द्यावा त्यात आम्ही किडनी विकून पैसे पाठवू असे म्हटलेले आहे . पत्रकार परिषदेला सुनील वाकडे , सुनील कोठकर , निलेश ढवळे , सचिन हावळे , सखाराम काळे यांच्यासोबत मराठा समाजातील इतर बांधव देखील उपस्थित होते.


शेअर करा