आम्ही भाजपला सोडलंय हिंदुत्वाला नाही , उद्धव ठाकरेंनी पुन्हा ठणकावलं

शेअर करा

उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेवर भाजपकडून सतत हिंदुत्व सोडल्याचा आरोप करण्यात येत असला तरी उद्धव ठाकरे यांनी मात्र संयमी भूमिका घेत , ‘ आम्ही तीस वर्ष भाजपसोबत होतो इतक्या वर्षात शिवसेनेची भाजप झाली नाही मग आता काँग्रेस सोबत जाऊन शिवसेनेची काँग्रेस कशी होईल ? प्रबोधनकार , शिवसेनाप्रमुख , माझे आणि आदित्य यांचे हिंदुत्व एकच आहे त्यात बदल झाला नाही . आम्ही भाजपला सोडलेले आहे हिंदुत्वाला नाही ‘, असे म्हटलेले आहे.

मुंबई इथे एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की , ‘ लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला सध्या सत्ताधाऱ्यांची वाळवी लागलेली आहे. सर्वोच्च न्यायालय हा एकच आशेचा किरण असून सरन्यायाधीश चंद्रचूड हे हुकूमशाहीला निश्चित चूड लावतील अशी अपेक्षा आहे यापूर्वी हिडीस कारभार असा म्हटले जायचे आता ईडीस कारभार म्हटले जाते .

आता समान नागरी कायदा आणायचा म्हणतात पण मी म्हणतो आधी सर्वांना समान कायदा लागू करा. विरोधकांना जेलमध्ये टाकणार आणि आम्ही ज्या चौकशा लावल्या होत्या त्यांना क्लीन चीट देणार ? . हे सरकार क्लीनचीट सरकार आहे . निवडणूक आयोगाने नशीब उद्धव ठाकरे हे नाव त्यांना दिले नाही . आम्ही चिन्ह देऊ शकतो पण आमच्या पक्षाचे नाव कोणाला देऊ शकत नाही . खाल्ल्या घरचे वासे मोजणाऱ्यांनी आम्हाला घरी बसून काम केले असे बोलू नये ‘, असा देखील टोला त्यांनी शिंदे गटाला मारलेला आहे. वाईट रुढी परंपरांचा त्याग करणे हे आमचे हिंदुत्व आहे माणसाला माणसासारखे जगू देणे हे आमचे हिंदुत्व आहे भाजपचे हिंदुत्व आम्हाला मला मान्य नाही , असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले .


शेअर करा