पुन्हा एका मराठा तरुणाचे टोकाचे पाऊल , दिवाळी तोंडावर असतानाच..

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक अशी घटना ऐन दिवाळीच्या तोंडावर परभणीत समोर आलेली असून मराठा आरक्षणासाठी एका तरुणाने टोकाचे पाऊल उचललेले आहे . दिवाळीच्या पहिल्याच दिवशी परभणीतील तरुणाने आत्महत्या केली असून घटनेनंतर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , मानिका महादू वाकोडे असे मयत तरुणाचे नाव असून तो मूळचा परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील लोणी खुर्द येथील रहिवासी आहे . अवघ्या 22 व्या वर्षी त्याने वधू-बारसच्या दिवशी हा प्रकार केलेला असून मराठा आरक्षण मिळत नसल्यामुळे आपण गळफास घेत आहोत असे सुसाईड नोटमध्ये म्हटलेले आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी अनेकदा मराठा समाजाला आणि मराठा तरुणांना आत्महत्या करू नका , जर तुम्हीच आत्महत्या करणार असाल तर मराठा आरक्षण कुणासाठी मिळवायचे ? असे आवाहन केलेले असले तरी देखील अशाच स्वरूपाच्या घटना समोर येत आहेत . मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू झाल्यानंतर वीस पेक्षा जास्त अशाच घटना समोर आलेल्या आहेत.


शेअर करा