बाळंतपणासाठी माहेरी गेलेल्या बायकोला तब्बल दीडशे वेळा कॉल , पोलीस कर्मचाऱ्याने नंतर..

शेअर करा

देशात एक धक्कादायक अशी घटना समोर आलेली असून अवघ्या अकरा दिवसांपूर्वी पिता बनलेला एक व्यक्ती पत्नीला भेटण्यासाठी म्हणून पोहोचला मात्र त्याच्या मनात संशयाचे भूत असल्या कारणाने तब्बल 230 किलोमीटरचा प्रवास करून त्याने पत्नीच्या माहेरी जाऊन तिचा गळा आवळलेला आहे . पत्नीचा यामध्ये मृत्यू झाला त्यानंतर आरोपीने स्वतः देखील कीटकनाशक प्राशन केले त्यामुळे त्याची देखील प्रकृती गंभीर आहे. अवघ्या 11 दिवसांपूर्वीच मूल झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. आरोपी हा कर्नाटक पोलीस कर्मचारी आहे .

उपलब्ध माहितीनुसार , बंगळुरू येथील ही घटना असून किशोर डी असे आरोपीचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे तो पोलीस दलात शिपाई म्हणून काम करत होता. कर्नाटकच्या चामराज नगर इथून तो पत्नीच्या गावी होसकोटी येथे गेला . 230 किलोमीटरचा प्रवास करून जाण्याआधी त्याने पत्नीला दीडशे वेळा फोन कॉल केला मात्र तिने रिप्लाय दिला नाही त्यामुळे संतापाच्या भरात तो तिथे गेला आणि पत्नीचा खून करून स्वतः देखील कीटकनाशक घेतले.

13 नोव्हेंबर 2022 रोजी किशोर आणि प्रतिभा यांचे लग्न झालेले होते लग्नानंतर आरोपी सतत स्वतःच्या बायकोवर चारित्र्याच्या कारणावरून संशय घेत असायचा. आलेला प्रत्येक फोन कॉल प्रत्येक मेसेज तो स्वतः चेक करायचा. ती कुणाशी काही बोलली तर लगेच तो कोण होता या संदर्भात देखील तिला विचारायचा त्यावरून त्यांच्या अनेकदा वाद झालेले होते.

तुझे कॉलेजच्या दिवसातल्या मित्रांसोबत संबंध आहेत असा आरोप आरोपी किशोर करत असल्याकारणाने बाळंतपणासाठी म्हणून प्रतिभा माहेरी गेली त्यानंतर तिने त्याच्याशी आईच्या सांगण्यावरून संपर्क कमी केला . घटना घडली त्या दिवशी त्याने तिला 150 वेळा फोन केला मात्र तिने फोन उचलला नाही त्यानंतर सकाळी साडेअकराच्या सुमारास किशोर प्रतिभाच्या माहेरी पोहोचला आणि त्याने आधी कीटकनाशक प्राशन केले त्यानंतर प्रतिभा आणि बाळ ज्या खोलीत होते त्या रूमचा दरवाजा बंद केला . गळा आवळून प्रतिभा हिची हत्या केली . पंधरा मिनिटांनी किशोर ओरडत रूमच्या बाहेर आला आणि त्यानंतर तेथून गायब झाला . सध्या त्याची प्रकृती गंभीर असून सुधारणा झाली तर त्याला ताब्यात घेण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आलेले आहे.


शेअर करा