डोळ्याला चष्मा जसाच्या तसा..,जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाचे टोकाचे पाऊल

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी जालना जिल्ह्यात समोर आलेली असून मूळ सोलापूर येथील एका पन्नास वर्षीय शिक्षकाने अंबड तालुक्यातील मठ तांडा इथे जिल्हा परिषद शाळेच्या खोलीत वर्गाच्या जिल्हा परिषद शाळेच्या वर्गाच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे . मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , केरप्पा दिगंबर घोडके ( वय 50 राहणार सोलापूर हल्ली मुक्काम पाचोड ) असे मयत शिक्षकाचे नाव असून आत्महत्या केल्याचे वृत्त समजताच परिसरात खळबळ उडाली आहे. मठ तांडा इथे इयत्ता पहिली पासून चौथीपर्यंत शाळा असून या शाळेत दोन शिक्षक आहेत.

त्यातील एक शिक्षक असलेले केरप्पा घोडके हे मंगळवारी शाळेत आलेले होते दुपारपर्यंत त्यांनी मुलांना शिकवले आणि दुपारी जेवणासाठी सुट्टी दिली त्यानंतर शाळेतील वापरात नसलेल्या खोलीत ते गेले आणि तिथे त्यांनी हा प्रकार केला . ग्रामस्थांना या प्रकाराची माहिती समजताच त्यांनी गोंदी पोलिसांना माहिती दिली . त्यांचा मृतदेह शव विच्छेदनासाठी पोलिसांनी पाठवून दिलेला असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे . मूळचे ते सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असून हल्ली पाचवड इथे राहत होते . त्यांनी टोकाचे पाऊल का उचलले याची माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाही.

सदर आत्महत्या केलेल्या शिक्षकांच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली असून या चिठ्ठीमध्ये ‘माझ्या मृत्यू ला कोणालाही जबाबदार धरू नये, बाळा, भैय्या, आरती तुम्हा तिघांना माझ्यामुळे आर्थिक, सामाजिक आणि मानसिक त्रास झाला. त्याबद्दल मला माफ करा. आई तुझे उपकार मी फेडू शकलो नाही मला माफ कर. माझ्या कुटुंबाला त्रास देणाऱ्याला सोडू नका’ असे नमुद केले आहे.


शेअर करा