दिवाळीच्या दिवशीच्या घरात हत्याकांड , लहान भाऊ अद्यापही फरार

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक अशी घटना सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात समोर आलेली असून कापरी इथे पैशाच्या वादात धाकट्या भावाने मोठ्या भावाचा लाकडी दांडके डोक्यात घालून खून केलेला आहे. धक्कादायक बाब म्हणजे दिवाळीच्या दिवशी रविवारी ही घटना घडली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , महेश राजेंद्र मोरे ( वय 27 ) असे मयत भावाचे नाव असून या प्रकरणातील संशयित आरोपी अविनाश राजेंद्र मोरे ( वय 22 ) हा घटना घडल्यानंतर फरार झालेला आहे. मयत व्यक्ती आणि आरोपी हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असून सध्या शिराळा तालुक्यातील कापरी इथे आईसोबत लहानपणापासून त्यांच्या आजोळी राहत होते.

मयत दोन्ही भावांचे वडील हे गावाकडेच असतात. महेश याचे लग्न झालेले असून त्याचा घटस्फोट देखील झालेला आहे. महेश आणि अविनाश या दोघांच्यामध्ये पैशाच्या देवाणघेवाणीवरून सतत वाद होत असायचे. दोन्ही भाऊ सेंट्रींगचे काम करायचे त्यात मयत महेश हा कामाचे पैसे घरात द्यायचा नाही म्हणून त्यांच्या सतत वाद होत होता.

12 तारखेला रात्रीच्या सुमारास अविनाश याचे आई आणि भावासोबत भांडण झाले त्यानंतर घराच्या समोर रस्त्यावर देखील त्यांनी भांडण सुरू केले त्यावेळी संशयित आरोपी अविनाश याने महेशच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार केला आणि त्यानंतर तिथून पळून गेला. महेश याच्या डोक्यात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यानंतर त्याचा जागेवरच मृत्यू झालेला आहे. महेश याच्या पश्चात आई-वडील असा परिवार असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जयसिंगराव पाटील हे करत असल्याची माहिती आहे .


शेअर करा