नगर हादरलं..कापूस चोरट्यांना प्रतिकार करताना शेतकऱ्याने गमावले प्राण

शेअर करा

महाराष्ट्रात नगर जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना पाथर्डी तालुक्यातील कडगाव शिवारात समोर आलेले असून कापूस चोरट्यांना प्रतिकार करताना शेतकऱ्याचा चोरांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झालेला आहे. दहा तारखेला हा प्रकार घडलेला असून परिसरात त्यानंतर शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार , कारभारी रामदास शिरसाठ ( वय 55 राहणार कडगाव तालुका पाथर्डी ) असे शेतकऱ्याचे नाव असून कडगाव शिवारातील मोहोजपासून मिरीपर्यंतच्या रस्त्यावर ही वस्ती आहे. त्यांनी त्यांच्या वस्तीवरील पत्र्याच्या शेडमध्ये दहा ते बारा गोण्यांत कापूस भरून ठेवला होता हा कापूस रात्री उशिरा चोरटे चोरी करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

शिरसाट यांनी त्यानंतर प्रतिकार सुरू केला त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांनी केलेल्या हल्ल्यात शिरसाट हे जागीच ठार झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी कुटुंबीयांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर पाथर्डी पोलिसात फिर्याद देण्यात आली. पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे घटनास्थळी पोहोचले होते. पोलिसांनी पंचनामा केलेला असून कारभारी शिरसाठ यांची अत्यंत कष्टाळू शेतकरी म्हणून गावात ओळख होती.


शेअर करा