केडगावमधून अल्पवयीन मुलगा झाला बेपत्ता,  दिसला तर मोबाईलवर करा संपर्क

शेअर करा

नगर शहरातील केडगाव येथून एक अल्पवयीन मुलगा  21 मार्च 2024 रोजी नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी म्हणून सकाळी दहा साडेदहाला घरातून गेला मात्र अद्यापपर्यंत तो परत आलेला नाही. गायब झालेला मुलगा अंबिका महाविद्यालयात शिकत असून तो आढळल्यास 9096397083,  9130504085 या नंबरवर संपर्काचे आवाहन करण्यात आलेले आहे

उपलब्ध माहितीनुसार , उदयनराजे राजू शेत्रे असे गायब झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव असून साऊ एकल महिला पुनर्वसन समिती यांच्या वतीने महिलांच्या पुनर्वसनासाठी प्रकल्प राबवले जातात.  त्यांच्या व्हाट्सअप ग्रुपवर या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे.  वरील फोटोतील मुलगा कुठेही आढळून आला तर वरील नंबरवर संपर्काचे आवाहन अशोक कुटे, सुजाता गोरे, प्रतिभा कुलकर्णी, प्रकाश इथापे, दत्ता उरमुडे यांनी केलेले आहे . 


शेअर करा