सुजय विखेंच्या प्रचारासाठी मोदी येणार , मंगळसूत्र म्हैस याच्या पलीकडे मोदी बोलतील काय ? 

शेअर करा

महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सात तारखेला नगर शहरातील सावेडी परिसरातील संत निरंकारी भवन येथील मैदानावर संध्याकाळी चार वाजता सभा घेणार असून भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सभेसाठी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आलेले आहे. 

नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी सहा तारीख ठरलेली होती मात्र एक दिवस मोदी यांचा महाराष्ट्र दौरा पुढे ढकललेला असल्याकारणाने सात मे रोजी ही सभा होणार आहे . प्रचार अखेरच्या टप्प्यात आलेला असल्याकारणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतील यावर आता भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे. मोदी यांच्या यांची मागील वक्तव्य ही मतदारांसाठी चेष्टेचा विषय झालेली असून मंगळसूत्र , म्हैस , हिंदू मुस्लिम , काँग्रेस , पाकिस्तान , काश्मीर यांच्या पलीकडे मोदी वेगळे काही बोलत नाहीत. 

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात खासदार सुजय विखे यांच्या समर्थकांकडून सध्या जोरदार प्रचार सुरू असला तरी सुजय विखे यांच्या यांना पक्षाअंतर्गत धुसफुसीचा सामना करावा लागत आहे. सुजय विखे हे अहंकारी असून कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाहीत असा आरोप यापूर्वीच अनेक जणांनी केलेला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा पाहण्याची इच्छा आहे म्हणून भाजप कार्यकर्ते सगळं काही पचवून प्रचारात मग्न आहे. 


शेअर करा